28/10/2026 English
9111111111

धुळ्यात दिवाळी तयारी

28/10/2026 · 0

धुळ्यात दिवाळी तयारी

धुळे : टुडे पान २ साठी....मेन -- फोटो क्रमांक : 33761 धुळे : जुने धुळे परिसरातील कुंभारवाड्यात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मातीच्या पणत्या व पूजेच्या साहित्याला आकर्षक रंगकाम करताना कुटुंबीय. (छायाचित्र : गोरख गर्दे) -- मातीच्या पणत्या, मूर्तींची रंगरंगोटी अंतिम टप्प्यात -- जुन्या धुळ्यातील कुंभारवाड्यात सणाची लगबग; इको- फ्रेंडली रंगांचा वाढता वापर सकाळ वृत्तसेवा ( आली दिवाळी ) धुळे, ता. २८ : अंधारावर प्रकाशाचा आणि असत्यावर सत्याचा विजय मिळवून देणारा दीपोत्सव अर्थात दिवाळी सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या मांगल्याच्या आणि चैतन्याच्या पर्वाचे स्वागत करण्यासाठी शहर व परिसरातील कुंभार आणि मूर्तिकार बांधवांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. जुने धुळे परिसरातील कुंभारवाड्यात सध्या मातीच्या पणत्या आणि लक्ष्मीमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात फिरवण्याची लगबग पाहायला मिळत आहे. - कुंभारवाड्यात पाऊल ठेवताच सणाचा उत्साह स्पष्ट जाणवतो. घरांच्या ओट्यांवर आणि मोकळ्या जागेत वाळत ठेवलेल्या कच्च्या मातीच्या वस्तू, वेगाने फिरणारी चाके आणि भट्टीतून बाहेर आलेल्या लालभडक पणत्यांचे ढीग लक्ष वेधून घेत आहेत. मातीच्या पारंपरिक पणत्या, बोळके, पूजेच्या वाट्या आणि सुबक लक्ष्मीमूर्ती घडवण्याचे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. बाजारातील वाढती मागणी वेळेत पूर्ण करण्यासाठी कारागिरांची धावपळ सुरू आहे. यंदा पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कारागिरांकडून इको- फ्रेंडली (नैसर्गिक) रंगांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. - लक्ष्मीमूर्तींची रंगरंगोटी दिवाळीत लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व असल्याने बाजारात विविध आकारांतील लक्ष्मीमूर्तींना मोठी मागणी असते. मूर्तींचे रंगकाम, डोळ्यांचे रेखीव रेखाटन, चेहऱ्यावरील प्रसन्न हावभाव, पारंपरिक दागिन्यांची सजावट आणि मुकुटाला चंदेरी-सोनेरी रंग देण्याचे नाजूक काम जोमाने सुरू आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मूर्तींना अत्यंत सुबक फिनिशिंग दिली जात आहे. - कुटुंबाचा मोलाचा हातभार मूर्ती तयार करणे, त्या सुरक्षित सुकवणे, रंगकाम करणे आणि पणत्यांची भट्टी लावून मांडणी करणे अशा कामांसाठी मोठा वेळ लागतो. सणाच्या तोंडावर ही कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी घरातील महिला, वृद्ध आणि शाळकरी मुलेही मोठ्या उत्साहाने हातभार लावत आहेत. शाळकरी मुले सुट्टीच्या वेळात पणत्या रंगवताना दिसत असून, संपूर्ण कुटुंब या कामात सहभागी झाले आहे. - १४-१ ..चौकट.. १४-१ पारंपरिक मातीच्या पणतीला पसंती आधुनिक काळात चायनीज दिव्यांची कितीही आवड असली, तरी घराच्या उंबरठ्यावर आणि अंगणात मातीची पणती लावणे हीच परंपरा मानली जाते. त्यामुळे यंदाही पारंपरिक मातीच्या पणत्यांना मोठी मागणी आहे. माती मळण्यापासून ते भट्टीत भाजण्यापर्यंतची कामे पूर्ण झाली असून, आता या पणत्यांच्या विक्रीसाठी सुरक्षित पॅकिंग सुरू आहे.

स्रोत: www.esakal.com

अर्ज भरायचा आहे?
टेस्ट ऑनलाइन सेंटर · टेस्ट रोड

हेही बघा