29/10/2026 English
9111111111

वीर बंदा बैरागी जयंती

28/10/2026 · 2

वीर बंदा बैरागी जयंती

धुळे टुडे २ साठी... --- फोटो-NSK26H33758 धुळे : वीर बंदा बैरागी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करतांना प्रदीप बैरागी, अमोल मासुळे व इतर पदाधिकारी. --- वीर बंदा बैरागींच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी --- मान्यवरांचे आवाहन; जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २८ : हिंदू धर्मरक्षक महाराज वीर बंदा बैरागी यांच्या त्याग, शौर्य आणि कार्यातून आपल्याला प्रेरणा मिळते. त्यांच्या विचारांचा व कार्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा, असे आवाहन मान्यवरांनी केले. हिूदं धर्मरक्षक महाराज वीर बंदा बैरागी यांच्या जयंतीनिमित्त २७ ऑक्टोबरला धुळ्यात अभिवादन कार्यक्रम झाला. मान्यवरांनी वीर बंदा बैरागी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन केले. महाराज वीर बंदा बैरागी यांच्या त्याग आणि संघर्षमय जीवनातून धर्मरक्षणाची प्रेरणा मिळते. त्यांच्या पराक्रमाचा आणि प्रेरणादायी इतिहास सर्वांपर्यंत पोहचविण्याचे काम प्रभावीपणे झाले पहिजे. त्यांच्या कार्यामुळे एकता, बंधुभाव आणि राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ होते. त्यामुळे नव्या पिढीतील युवकांनी वीर बंदा बैरागी यांच्या विचारांनी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून द्यावे, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले. या वेळी नगरसेवक प्रदीप बैरागी, नगरसेवक अमोल मासुळे, वैष्णव बैरागी फाउंडेशनचे हिरालाल बैरागी, सचिव बंटी बैरागी, गुड्डू बैरागी, राजू बैरागी, युवा अध्यक्ष सिध्दांत बैरागी, रवींद्र बैरागी, रोहित अहिरे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. ---

स्रोत: www.esakal.com

अर्ज भरायचा आहे?
टेस्ट ऑनलाइन सेंटर · टेस्ट रोड

हेही बघा